विदर्भ दखल न्यूज
पवन खोब्रागडे
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
नेटवर्क अभावी राशन कार्डधारकांना राशन खतविण्याकरिता कामधंदे सोडून जावे लागते दुसऱ्या गावी
राशन कार्ड धारकाकडून होत आहे संताप व्यक्त प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
प्राप्त झालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्हा अंतर्गत अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील रामगड, दादापुर परिसरातील राशन कार्ड धारकांना राशन खतवी ण्याकरिता गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे राशन कार्ड धारकांना राशन खतविण्याकरिता पुराडा या गावांमध्ये जावे लागत आहे. सध्याच्या घडीला शेतीचे कामे सुरू असून राशन कार्ड खातविण्याकरिता दुसऱ्या गावी जावे लागत असल्याने राशन कार्ड धारकाचे शेतीचे
कामामध्ये मोठा खोळंबा होत आहे .आणि राशन कार्डधारकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या बाबीकडे प्रशासन काना डोळा करीत असल्याचे राशन कार्ड धारकाचे म्हणणे आहे. प्रशासनाने राशन कार्ड धारकाच्या समस्या लक्षात घेऊन परिसरातील नेटवर्क कंपन्यांना सूचना देऊन रामगड दादापूर येथील नेटवर्क कंपन्यासोबत पाठपुरावा करून राशन कार्डधारकांची समस्या मार्गी लावावी अशी मागणी राशन कार्डधारकातून होऊ लागली आहे. मात्र राशन कार्ड खतविणाऱ्या मशीन करिता नेटवर्क उपलब्ध नसल्याने राशन कार्डधारकांमधून संताप व्यक्त होत आहे


Post a Comment