वाघाने ठार केलेल्या देऊळगाव येथील महिलेच्या कुटुंबीयास वन विभागाने दिली आर्थिक मदत ...


विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 
आरमोरी 



आरमोरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र आरमोरी नियतक्षेत्र इंजेवारी येथील कक्ष क्रमांक 798 मौजा-देऊळगांव गावालगत जंगल परिसरात दिनांक 19/11/2025 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 चे दरम्यान श्रीमती मुक्ताबाई दिवाकर नेवारे, वय 79 वर्षे रा. देऊळगांव ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली यांचेवर वन्यप्राण्याने हल्ला करुन ठार मारल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच मा. उपवनसंरक्षक वडसा, मा. सहाय्यक वनरक्षक वडसा, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) आरमोरी व इतर वनकर्मचारी तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी मिळुन घटनास्थळी जावुन चौकशी केली. चौकशी दरम्यान श्रीमती मुक्ताबाई दिवाकर नेवारे, वय 79 वर्षे रा. देऊळगांव हया दिनांक 19/11/2025 रोजी दुपारी जंगल परिसरात जलावु सरपनासाठी गेले असता त्यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला करुन त्यांना ठार केले. मौक्यावर मौकापंचनामा नोंदवुन सदरचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे शवविच्छेदन (P.M.) करण्याकरीता शासकीय वाहनाने पाठविण्यात आला. मृतकाचे कुटुंबीयास तात्काळ आर्थीक मदत म्हणुन वन विभागाच्या वतीने सानुग्रह रक्कम रुपये 25000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) रोखीने देण्यात आली. आजुबाजुच्या परिसरात मानव वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती करुन गावकऱ्यांना सावध राहण्याच्या सुचना दिल्या. सदरच्या परिसरामध्ये वनकर्मऱ्यामार्फत गस्त वाढविण्यात आली. तसेच अशी घटणा पुन्हा होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जंगल परिसरात कुणीही विनाकारण जावु नये असे वनविभागाच्या वतीने आव्हाहन करण्यात आले आहे

सदरच्या परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचाली टीपण्याकरीता ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. मा. उपवनसंरक्षक, वडसा वनविभाग, वडसा यांचे मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरु आहे.

(प्रविण आर. बडोले) वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक आरमोरी

0/Post a Comment/Comments