विहीरगाव (कुकडी) येथील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करा.. परिसरातील शेतकऱ्यांची निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी...


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली


आरमोरी तालुक्यातील विहिरगाव कुकडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फतीने चालविण्यात येणारे शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र मागील चार ते पाच वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना धान्य विक्रीकरिता मोठा नाहकमानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. आणि संबंधित खरेदी केंद्र हे वडेगाव येथील खरेदी केंद्राला तात्पुरत्या स्वरुपात जोडल्याने




 शेतकऱ्यांना आपले धान्य विक्री करिता वडेगाव येथे नेण्याकरिता वाहतुकीस परवळणारे नसून शेतकऱ्यांना मोठा मानसिक त्रास होत आहे. विहिरगाव खरेदी केंद्र अंतर्गत दहा गावे येतात.दहा गावातील शेतकऱ्यांना धान्य विक्रीकरिता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून वडेगाव खरेदी केंद्र दूर होत असल्याने विहिरगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण होत आहे. मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे या समस्याचे निराकरण करण्याकरिता आपली मागणी घेवून शेतकऱ्यांनी दिनांक 13 .11. 2025 गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन संबंधित शेतकरी हिताच्या मागणी करिता जिल्हाधिकारी




 कार्यालयातील उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी स्वीकारून लवकरात लवकर आपली मागणी पूर्ण करू असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता विहिरगाव येथील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू होण्याकरिता पल्लवीत झाल्या आहेत.
निवेदन देताना परिसरातील शेतकरी मुनेश्वर भैसारे दिनेश बनकर मनोहर मुल्लेवार विलास जुमनाके लुमेश रोहनकर जगदीश पेंदाम भावेश खोब्रागडे पूरशत्तम पदा आदी शेतकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments