गांगलवाडी ते व्याहाड मार्गावरील बोडधा येथील नाली बांधकामामुळे शक्तीग्रस्त झालेल्या नळ योजनेची पाईपलाईन दुरुस्ती तात्काळ करा... कॉ. विनोद झोडगे..

विदर्भ दखल नूज 
संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली.


ब्रम्हपुरी: गांगलवाडी ते व्याहाड जिल्हा मार्गाच्या बांधकाम अंतर्गत मौजा बोडधा येथील नालीचे बांधकाम सुरू असून सदर बांधकामा मुळे बोडधा येथील नळ योजनेची मुख्य पाईप लाईन वितरण व्यवस्था गेल्या 3 महिन्या पासून श्रतीग्रस्त झालेली आहे त्यामुळे कृतीम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
नळ योजनेची पाईप लाईन दुरुस्ती करून द्या या मागणी चे निवेदन ग्रामपंचायत च्या वतीने 14 ऑक्टोबर 2025 रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व सबंधित रोड ठेकेदार यांना दिला होता परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे यांच्याकडे तक्रार केली.




पाण्याची गंभीरता लक्ष्यात घेत कॉ.झोडगे यांनी आक्रमक भूमिका घेत रोड ठेकेदार गुरु भक्षणी, रॉय तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम यांना फोन करून तत्काळ नळ योजनेची पाईप लाईन दुरुस्ती करण्याची मागणी केली असता ठेकेदारांनी सबंधित रोड कामावरील इंजिनिअर दिलीप धाकडे यांना त्वरित बोडधा येथे पाटविले .त्यांनी गावकऱ्यान सोबत चर्चा करून येत्या दोन दिवसात नळ योजनेची पाईप लाईन दुरुस्ती करण्याचे मान्य केले आहे.यावेळी चर्चा करतांना कॉ विनोद झोडगे,सरपंच मनिषा झोडगे,माजी सरपंच शरद ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते धनराज ठाकरे,ग्रामसेवक चंद्रशेखर पाटील,अमोल ठाकरे, डाकराम ठाकरे,रुपाजी ठाकरे, बाळूजी ठाकरे, तुळशीराम वघारे, हजारे,लहुजी ठाकरे रेवनाथ ठाकरे, हिवराज ठाकरे
यासह आदी गावकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments