वैद्यराज समर्थ व हजारे यांचा राष्ट्रीय वनौषधी ज्ञानसंगोपनात झाला सन्मान..

बाळकृष्ण उंबरकर
 तालुका प्रतिनिधी _ 
 नागभीड _


 छत्तीसगढ़ मधील गौरेका, पेन्द्रा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वनौषधी ज्ञानसंगोपनात चंद्रपूर जिल्ह्यामधील नागभीड तालुक्यामधील चिंधीचक येथील वैद्यराज मनोज समर्थ व मिंथुर येथील कार्तिक हजारे यांना राष्ट्रीय सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले पारंपारिक वनौषधी उपचार पध्दतीत उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले देशातील २५ राज्यामधील १२०० वैद्य आणि आयुर्वेद तज्ञांच्या उपस्थितीत त्यांच्या




 कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली चिंधीचक येथील मनोज समर्थ यांच्या आदिनाथ वनौषधी व मिंथुर येथील कार्तिक हजारे निसर्गोपचार केंद्राच्या औषधांना वैज्ञानिक आणि संशोधकाकडून विशेष प्रतिसाद मिळाला तसेच हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय वनौषधी महाकुंभात प्रतिनिधी म्हणून यांची निवड झाली आहे यासोबतच त्यांची अखिल भारतीय परंपरागत वनौषधी प्रशिक्षीत वैद्य महासंघाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी नियुक्ति करण्यात आली आहे त्यामुळे ही विदर्भासाठी अभिमानाची बाब ठरली आहे पारंपरिक वनौषधीचे स्थान        पारंपरिक वनौषधी सध्या आजच्या युगात महत्वाचे स्थान निर्माण करत आहे नैसर्गिक चिकीत्सालया मध्ये आता बरेच लोक उपचार घेऊन सन्तुष्ट व्यक्त करत आहेत त्यामुळे हा वारसा टिकून राहणे अत्यंत गरजेचे आहे सोबत दुर्मिळतेचे जतन व्हावे यासाठी शासनाने योग्य ते निर्णय घेणे गरजेचे आहे असे कार्तिक हजारे यांचे म्हणने आहे

0/Post a Comment/Comments