विदर्भ दखल न्यूज
संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
कुरखेडा -26 नोव्हेंबर 2025 रोजी कुरखेडा येथे तालुका स्तरीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात बोधिवारो विहार येथे समता सैनिक तथा तालुक्यातील आलेले सर्व बौध्द बांधव एकत्रित होऊन संविधान रॅलीला सुरुवात करून कुरखेडा शहरात संविधान दिनानिमित्त घोषणा देत जागृती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व रॅली तपोभूमी विपश्यना केंद्र येथे आल्यानंतर बाबासाहेबांना
अभिवादन करून संविधान उद्धेशिकाचे वाचन करून मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्ष म्हणून श्री. संजय रामटेके सर.. यांनी संविधानावर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे श्री खोपे सर. आडे सर वी. महा.कुरखेडा
यांनी सुद्धा संविधानावर भर घातली.कार्यक्रमारिता प्रल्हाद कराडे. जगन्नाथ जांभूळकर . हिराजी वालदे. पुरुषोत्तम भैसारे. समर्थ शहरे. सुनिल सहारे.सुनिल चौधरी.पंकज राऊत. दिलीप सहारे व सर्व बौध्द बांधवांनी सहकार्य केले. संचालन श्री माने सरानी केले. प्रास्ताविक श्री. सुरेश कराडे सर. आभार प्रदर्शन श्री खेमराज धोंडणे यांनी केले.



Post a Comment