तलाठी सापडला एसीबीच्या जाळ्यात

विदर्भ दखल न्यूज 



पूणे ब्युरो 
मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा अंतर्गत येत असलेल्या दौंड तालुक्यातील देलवडी साजा येथील तलाठी नामे दीपक नागनाथ आजबे व 39 वर्ष या तलाठ्याला लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत




 प्रतिबंधक विभागाने पकडले. अशी माहिती मिळाली तलाठी दीपक नागनाथ आजबे याने एका शेतकऱ्याचा सातबारा उतारावरील दुरुस्तीकरिता दोन लाख रुपयांची लाच मागितली होती या प्रकरणी चौफुला साईनाथ कॅन्टीन जवळ सापडा रचून सदर कारवाई करण्यात आल्याचे समजते या प्रकरणी एका पन्नास वर्षीय शेतकरी याने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तक्रारदार शेतकऱ्यांनी 2012 मध्ये सुद्धा देलवडी येथील गट क्रमांक 1506 मधील 0.6 आराजी असलेले शेत खरेदी केले होते मात्र महसूल दप्तरी त्याची नोंदणी सुद्धा झाली होती जुलै 2024 मध्ये संगणकाद्वारे सातबारा काढून घेतला असता त्या सातबारा वरती 0.6 अवैजी 0.3क्षेत्र नोंद असल्याचे समजले पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

0/Post a Comment/Comments