नवेगाव मुरखळा बंद असलेला पाणीपुरवठा आमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने अखेर सुरू...

विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक 



 गडचिरोली 
गडचिरोली - थकीत रकमेसाठी कंत्राटदारानी नवेगांव मुरखळा ग्रामपंचायत पाणी पुरवठा बंद केल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत असल्यामुळे सदर बंद असलेला पाणी पुरवठा योजना त्वरीत सुरू करावी अशी मागणी माजी जि.प. अध्यक्ष ॲड. राम मेश्राम यांनी आमदार विजयभाऊ वडेट्टिवार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे माजी जि.प सदस्य ॲड. राम मेश्राम यांनी वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा केल्याने आज दि. २१ नोव्हेंबर २०२५ ला मुरखळा येथील बंद असलेला पाणीपुरवठाआमदार वडेट्टिवार यांच्या प्रयत्नाने अखेर सुरु झाला.
मुरखळा नवेगांव ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मागील तिन वर्षा पासुन कंत्राटदार गडपल्लीवार यांनी काम सुरु केले परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने १५ लाख २१ हजार रुपये कंत्राटदारांना अदा न केल्यामुळे त्यांनी अनिश्चित काळाकरीता कामकाज बंद केलेले होते . सदर ग्रामपंचायतचे उत्पनही भरपुर असतांना व मागील सभेत चर्चा होवून मुरखळा ग्रामपंचायत




 प्रशासनाने काळजी घेऊन कान्ट्राक दारांना बोलवून चर्चा करून सदर नळ योजना सुरु केली आहे.
माजी जिप सदस्य ॲड. राम मेश्राम उपसरपंच राजुभाऊ खंगार ग्रा.प सदस्य उमाजी खेवले सुप्रियाताई गायकवाड शैलाताई कोकोडे रेखाताई लोणारकर दामदेवजी मंगलवार अमोल निकुरे जिवन कुत्तरमारे आनंद मोहुर्ले गौरव येनप्रेड्डीवार जगदिश चौधरी भाष्कर पडीहार उमेश पेटकर व समस्त ग्रामपंचायतमधिल नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे व आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments