विदर्भ दखल न्यूज
आरमोरी
आरमोरी :-
डोंगराळे गाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील तीन वर्षीय चिमुकलीवर अ मानवी अत्याचार करून क्रूरपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ सोनार समाज आरमोरी तसेच सराफा असोसिएशन आरमोरी तर्फे मूक मोर्चा तसेच कॅण्डल मार्च काढून सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माननीय तहसीलदार यांच्या मार्फतीने निवेदन देऊन करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना दिनांक 16 नोव्हेंबर रोजी घडली. गावातील एक 24 वर्षीय नराधम विजय
खैरनार याने क्षुल्लकशा कारणावरून चिमुकलीवर अ मानवीय अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडल्याने अख्या महाराष्ट्रातील जनता पेटून उठलेली आहे. सदर घटनेचा निषेध करण्याकरिता व आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होण्याकरिता आरमोरी येथील सराफा व्यावसायिक तसेच समाज बांधव व महिलांनी कॅण्डल मार्च काढून मूक मोर्चा द्वारे निषेध व्यक्त केला. आरमोरी येथील इंदिरा गांधी चौकामध्ये पीडित चिमुकलीला मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाला सोनार समाजाचे अध्यक्ष पंकज खरवडे, कार्याध्यक्ष विनोद बेहरे,सराफा असोसिएशन चे अध्यक्ष अरुण हर्षे, विजय खरवडे, दिपक बेहरे, अजय काळबांधे, बबन बेहरे, कुणाल भरणे, प्रभाकर करंडे, ओमकार इन्कने, दिलीप इन्कने, दिलीप हाडगे, दिलीप श्रीरंगे, अनंता बेहरे, सुधीर गजपुरे, प्रणव गजपुरे, प्रकाश बेहरे, अक्षय बेहरे, रमेश इन्कने, रमेश खापरे, नितीन खापरे, श्रीकांत बेहरे, रंजित बेहरे, प्रेमनाथ बेहरे, सौ विद्या इंकने, अंजली बेहरे, चंदा खापरे ,गायत्री बेहरे व इतर असे बहुसंख्येने समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.



Post a Comment