विदर्भ दखल न्यूज
: मंगेश बनसोड
प्रतिनिधी कुरखेडा
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा रस्त्यावर दिनांक 25 नोव्हेंबर ला संशयित गाडीमध्ये गोवंश तस्करी करीत असल्याचे कुरखेडा पोलिसांना गोपनीय माहिती द्वारे माहिती झाली होती. त्या आधारे कुरखेडा पोलिसांनी सापडा रचून संशयित गाडीला गेवर्धा मार्गावर थांबवला असता. गाडीमध्ये भरपूर प्रमाणात
गाई असून सोबत गाडी चालक , क्लिनर आणि सोबती सापडला. गाडी नंबर CG 09 JA 7013 असे असून गाडी आणि आरोपींना अटक करण्यात आले होते .
ही कारवाई कुरखेडा पोलीस निरीक्षक महेंद्रजी वाघ( PI ) यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.
तसेच पो. उप. निरीक्षक दयानंदजी भोंबे ( PSI ) पो. शी. संदेश भैसारे यांच्या पथकाने राबविली होती. 24 तारीख आणि 25 तारीख या दोन्ही दिवसाच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे गोवंश तस्करी वाल्यांना मोठा धक्का बसला आहे.


Post a Comment