विदर्भ दखल न्यूज
सोलापूर ब्युरो
14 महिन्याच्या मुलाला विष पाजून एका विवाहित महिलेने स्वतःही आत्महत्या केल्याची घटना 9 नोव्हेंबर सकाळच्या सुमारास बार्शी येथे उघडकीस आली आहे. सोलापूर जवळील बार्शी शहरांमध्ये वाणी प्लांट परिसरामध्ये ही घटना घडली अंकिता वैभव उकिरडे वय 25 वर्ष असे आत्महत्या केलेल्या
विवाहितेचे नाव आहे आणि आण्विक वैभव उकिरडे असे 14 महिन्याच्या बाळाचे नाव आहे मात्र आत्महत्या केल्यानंतर सदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे महिलेचा मुलगा अस्वस्त असल्याने त्याला रुग्णालयात भरती केल्याची माहिती आहे 14 महिन्याच्या मुलाला विष पाजून स्वतः आपली जीवन यात्रा संपविल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. महिलेचा चौदा वर्षाचा मुलगा हा रुग्णालयामध्ये मृत्यूची झुंज देत आहे सदर महिलेचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते अशी माहिती मिळाली आहे.
घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.


Post a Comment