बल्लारपूर नगर परिषदेत आरपीआयचे नगराध्यक्षसह 10 नगरसेवक रणांगणात..

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


चंद्रपुर - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर नगर परिषदमधे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआने स्वतंत्रपणे नगराध्यासह १० नगरसेवक बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीत रिंगणात उभे केलेलेआहेत.
यात नगराध्यक्ष पद ओबिसी महिलाकरीता राखीव असुन वंदना पंचशिल तामगाडगे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी देण्यात आली तर १० नगरसेविकामधे अजय जनिराव चव्हाण रिपाई तालुकाध्यक्ष यांचेसह ०९ नगरसेवक वेगवेगळ्या प्रभागात उभे केलेले आहे.
निवडणुक प्रक्रियेतील अंतिम यादी पूर्ण झाल्याने निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारासह कार्यकर्त्यांची बैठक पवन भगत यांचे लॉन मधे राजु झोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमधे महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य रिपाई गोपाल रायपुरे



 नागपुर प्रदेश सरचिटणिस शिद्धार्थ सुमन पवन भगत जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे जिल्हाउपाध्यक्ष कोमल रामटेके जिल्हा महासचिव रविंद्रनाथ पाटिल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वंदना तामगाडगे रिपाई तालुका अध्यक्ष तथा उमेदवार अजय चव्हाण जिल्हा सचिव



 निरज वाळके बल्लारसा उपाध्यक्ष सुधाकर थैरकर अजय पाटिल राहुल सुर्यवंन्शी ॲङ प्रियंका चव्हाण संपत कोरडे संजय डुमरेआदि सहीत बहुसंख्य रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडणुकीची संपुर्ण जबाबदारी पवन भगत यांचेवर सोपविण्यात आली असून रिपाई स्वतंत्रपणे निवडणुका लढवित असल्यामुळे बल्लारपुर नप निवडणुकीत रंगत येण्याचे चिन्ह आहेत.

0/Post a Comment/Comments