विदर्भ दखल नूज
गडचिरोली
मिळालेल्या माहितीनुसार पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चुरचुरा चक्क परिसरात जंगली हत्तीने शेतामध्ये शिरकाव करून धान्य पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केलेली आहे. सध्याच्या चालू स्थितीमध्ये मध्यम स्वरूपाच्या धान्य कापणीला आले आहे . आणि अश्यातच जंगली हत्तीने शेतामध्ये आपलं धुमाकूळ घातला आहे.बऱ्याच कालावधीपासून जंगली हत्तीने आपले बस्तान जंगल परिसरात शेत शिवारामध्ये मांडले आहे. जंगल लगत काही शेती शिवार लागून असून शेतामध्ये जाणे सुद्धा शेतकऱ्यांना कठीण झाले आहे यावर्षीच्या कालखंडामध्ये जंगली हत्तीने सूर्य डोंगरी देलोडा नवरगाव शिरशी वैरागड परिसरामध्ये भरपूर प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. मात्र उपवनसंरक्षक वडसा हे मात्र बघायची भूमिका घेत असल्याचा संताप सुद्धा शेतकऱ्यांनी यांच्याकडून व्यक्त होताना दिसत आहे. वन प्रशासनाने जंगली हत्तीच्या बाबतीत काही ठोस उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांची होणारे नुकसान टाळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता जंगली हत्तीचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी मोठा जनआंदोलन उभारणार अशी माहिती आमच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी दिली आहे.

Post a Comment