काँग्रेस आरपीआय गटबंधनात सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच.... अन्यथा निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागा.. डॉ. राजेंद्र गवई

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली




नागपुर - होवु घातलेल्या जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकीत कांग्रेस - आरपिआय गठबंधनात RPI ला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच . . अन्यता आरपिआय संपुर्ण महाराष्ट्रात स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल. कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी लढून कामाला लागा आचारसहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. RPI कुण्या पक्षाच्या पाया पडत नाही. सत्ताधारांनी कितीही आमिष दाखवले तरीही मी जाणार नाही RPI स्वाभिमानाने जगणारा पक्ष आहे नाहीतर RPI कधीचीच संपली असती डॉ. बाबासाहेब



 आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित RPI फक्त आमच्याकडेच आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे असा सल्ला नागपूर येथील अमृत भवनात पार पडलेल्या रिपब्लिकन कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी दिला.
अमृत भवन नागपूर येथे पार पडलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्ष RPI चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामरावजी दाभाडे रिपब्लिकन विचारवंत रमेशजी जिवने राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.अजितसिंह चहल नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे महासचिव शिद्धार्थ सुमन प्रशांत ढेंगरे सिने दिग्दर्शक राज मुंबई RPI चे जेष्ठ नेते नेताजी बुलचुंडे गोपाल रायपूरे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर चंद्रपुर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे गोंदिया जिल्हाध्यक्ष निलेश मेश्राम वर्धा जिल्हाध्यक्ष ॲड. नरेंद्र पाटिल नागपूर जिल्हाध्यक्ष रविंद्र थूल महासचिव आशिष मेश्राम महिला आघाडी प्रमुख विनाताई जुनघरे ॲड. प्रियंका चव्हाण आदि मंचकावर प्रामुख्याने उपस्थित होते.




कार्यक्रमाचे संचलन विनोदकुमार धाबर्डे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुंभे तर आभार क्षितिज गायकवाड यांनी मानले. मेळाव्यात बहुसंख्य कार्यकर्त्या साहित गडचिरोली जिल्हयातून जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे सरचिटणिस सुनिल सहारे कुरखेडा तालुकाध्यक्ष प्रमोद सरदारे युवा नेता संतोष खोब्रागडे , जेष्ठ कार्यकर्तो लवकुंश भैसारे भानारकर ताराचंद नंदेश्वर जिवन मेश्राम रोशन उके कविश्वर झाडे हेमंत बारसागडे सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments