विदर्भ दखल न्यूज
राजुरा ब्युरो
राजुरा
राजुरा(दि.9ऑक्टोबर):-अवैधरित्या ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून ट्रॅक्टर जात असताना गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाने अवैधरित्या वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर वर कारवाई केली आहे .सदर कारवाई 8 10 2025 रोजी पहाटे सात वाजेच्या सुमारास करण्यात आली . कारवाई दरम्यान बिना नंबरच्या गाड्या आढळल्या या प्रकरणी आरोपीच्या विरोधात. अवैध वाळू गौण खणीज चोरी प्रकरणी विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेअवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या विना नंबर प्लेट असलेल्या दोन ट्रॅक्टर वर महसूल विभागा ने कारवाई केली आहे.सदर कारवाई दिनांक 08.10.2025 रोजी रात्री 1 वाजताच्या दरम्यान रामपूर मार्गेने राजुरा कडे येणाऱ्या एक ट्रॅक्टर वर करण्यात आली. आणि दुसरी करवाही दिनांक 08.10.2025 रोजी पहाटे 6 जावताच्या दरम्यान भवानी मंदिर नाल्या मधून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर करण्यात आली.आहे अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन्ही ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात आहेत. पुढील कारवाई महसूल विभाग करीत आहे.

Post a Comment