वसा .. पोर्ला जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रासाठी विकासाचा नवीन चेहरा सुषमा विनोद दशमुखे इच्छुक...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


गडचिरोली - गडचिरोली जिल्हयातील जिल्हा परिषदेचे बिबुल लवकरच वाजण्याची दाट शक्यता वर्तविली जात असतांना वसा - पोर्ला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुषमा विनोद दशमुखे ह्या इच्छुक आहेत.
वसा - पोर्ला जि.प निर्वाचन क्षेत्र महिला obc प्रवर्गासाठी असल्यामुळे या निर्वाचन क्षेत्रात पुरुषांचा हिरमोड झालेला आहे. इच्छुक असलेले भाजपाचे विलास दशमुखे , प्रशांत वाघरे , रत्नदिप म्हशाखेत्री राष्ट्रवादीचे हेमंत रामटेके, शंकरराव इंगळे,सुजित राऊत आदिचा सुद्धा हिरमोड झालेला असून आता काग्रेस,भाजपा व राष्ट्रवादी महिला उमेदवारांच्या शोधात आहेत.
माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे ह्यांच्या सुषमा विनोद दशमुखे ह्या वहिनी असून वसा - पोर्ला जि.प क्षेत्रात विलासराव परिचयाचे असुन त्यांनी सदर क्षेत्रात केलेला विकास व कार्य आजही नागरिकांच्या लक्षात असुन सुषमाला भाजपाकडून उमेदवारी मिळाली तर त्या सदर क्षेत्राचा विकास करू शकतात एवढे मात्र निश्चित . विलास दशमुखे यांचा जनसंपर्क , विकासाची कामे करण्याची शैली लक्षात घेता भाजपाला असा तोडीचा उमेदवारही शोधुन सापडणार नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी..

0/Post a Comment/Comments