विदर्भ दखल न्यूज
ब्रम्हपुरी ब्युरो
मिळालेल्या माहितीनुसार
ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्हा अंतर्गत येत असलेल्या ब्रम्हपुरी येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापकाने
रसायनशास्त्र विषयाच्या प्रॅक्टिकलच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) उघडकीस आली.
पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारी वरून ब्रह्मपुरी पोलिसांनी प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रा. प्रदीप नंदनवार (३५) असे तक्रारीवरून आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे.
पीडित विद्यार्थिनी ८ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये कॉलेजला गेली होती रसायन शास्त्र या विषयाच्या प्रॅक्टिकलच्या निमित्ताने प्रा. प्रदीप नंदनवार याने सर्व विद्यार्थिनींना प्रॅक्टिकल रूममध्ये बोलाविले होते मात्र प्राध्यापकाने. त्यानंतर इतर विद्यार्थिनींना बाहेर पाठवून तिला एकटीलाच थांबवून विनयभंग केला.
या प्रकाराने विद्यार्थीनि घाबरून गेली आणि लगेच वर्गामध्ये आली. घडलेला प्रकार मैत्रिणीना सांगितला
. त्यानंतर विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी बसस्थानकावर येताच आरोपी प्राध्यापकाने तिला फोन केला. विद्यार्थिनीने घरी परतल्यावर संपूर्ण घटनाक्रम आई-वडिलांना सांगितलीअसता आई वडिलांनी मुलीला
सोबत घेऊन गुरुवार 9 , 10 ,2025 ला
ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. मुलगी व आई वडिलांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी प्रा. नंदनवार याच्याविरुद्ध बीएनएस ७४, ७५ (१) (आय) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतल खोब्रागडे करीत आहेत.

Post a Comment