विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही... वामनराव चटप माजी आमदार

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 
गडचिरोली
गडचिरोली - विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही . त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले . गडचिरोली येथील यमुना लॉन येथे विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला . माजी आमदार वामनराव चटप पुढे म्हणाले की , विदर्भात सोने, हिरे , मोती यांची खान असून विदर्भातील करोडो महसुल सरकारला मिळतो पण विदर्भातील जनता दारिद्रयाचे जीवन जगत आहे .
यावेळी मुख्य मार्गदर्शिका रंजनाताई मामर्डे म्हणाले की, स्वतंत्र विदर्भाचा लढा गेल्या १२० वर्षापासून सुरु आहे . परंतू कॉग्रेस आणि भाजप सरकारने विदर्भातील जनतेला धोका दिला . तसेच डॉ. पि. आर. राजपुत म्हणाले की . विदर्भातील खनीज विदर्भाच्या बाहेर गेल्याने प्रचंड प्रमाणात बेरीजगारी निर्माण झाली . विदर्भ स्वतंत्र झाल्यास सर्वच समस्या सुटतील .
कार्यक्रमाचे उदघाटन अरूणभाऊ केदार अध्यक्ष पूर्व विदर्भ हे होते तर स्वागताध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी पाहुण्याचे स्वागत केले . यावेळी ॲड . निरज खांदेवाले अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी मार्गदर्शन केले . तसेच डॉ . रमेश गजबे कोअर कमेटी , मुकेश मासुरकर , सुनिल चोखारे उपाध्यक्ष पूर्व विदर्भ , ॲड सुरेश वानखेडे उपाध्यक्ष पश्चिम विदर्भ, संजय केवट अध्यक्ष भंडारा गोंदिया , अशोक पोरेडडीवार , अमिता मडावी , छैलबिहारी अग्रवाल कोअर कमेटी, राजेंद्रसिह ठाकूर जिल्हाध्यक्ष उत्तर गडचिरोली , कृष्णराव भोंगाळे , मधूसुधन कोवे यवतमाळ , गोपाल रायपूरे, प्रमोद राऊत, राजकुमार शेंडे भोजराज कान्हेकर यांनी मार्गदर्शन केले .



या कार्यक्रमाचे संचालन डॉ . चंद्रसुरेश डोंगरवार, स्वागताध्यक्ष प्रा . मुनिश्वर बोरकर , प्रास्ताविक अरुणभाऊ मुनघाटे आभार नज्जुर जमुन शेख यांनी केले . विजय शेंडे यांनी सुमधूर आवाजात विदर्भवादी गीताचे गायन केले .
यावेळी मारोती लाटेलवार , हेमंत मरकाम, दशरथ साखरे , घिसु पा. खुणे , मारोती भैसारे , पांडुरंग पा. घोटेकर ' विधाते चोखोबा ढवळे , गुरुदेव भोपये , प्रा .चोपराम कांबळे , दिनेश बनकर , सोनुजी साखरे , जीवन मेश्राम, लवकुश भैसारे , प्रेमदास रामटेके, दामोधर शेंडे , मुक्ताजी दुर्गे, रोशन उके , हेमंत



 बारसागडे, अरविंद कोहळे, लता रामटेके , प्रेमिला नान्होरीकर, संघमित्रा राजवाडे लता भैसारे प्रेमलता कान्हेकरआदि सहीत बहुसंख्य विदर्भवांघी कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments