विदर्भ दखल न्यूज
बाळकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी
नागभीड
नागभीड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मौजा ढोरपा या गावामध्ये आज दिनांक १४/१०/२०२५रोजी ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिन पंचरंगी ध्वज फडकवून गावामधुन मिरवणूक काढून मोठ्या उत्सवात, आनंदात साजरा करण्यात आला या धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्ध समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री राजहंस बागडे होते तर प्रमुख आतिथी म्हणून बौद्ध समाजाचे अध्यक्ष श्री रामदास खोब्रागडे, सुखदेव राऊत माजी सरपंच, बाळकृष्ण उंबरकर अध्यक्ष तंटामुक्ती समिती, फुलदास उंबरकर सदस्य ग्राम पंचायत, सुधाकर मेश्राम सदस्य ग्राम पंचायत, ब्रम्हानंद नवघडे, शंकर उंबरकर, स्वास्तिक वासनिक पोलीस पाटील, जनार्दन निशाने, भिमराव मेश्राम, सौ प्रतिभा मेश्राम सदस्य ग्राम पंचायत, सौ लिला रामटेके, सौ ज्योती बांबोळे, सौ सविता खोब्रागडे होते कार्यक्रमाला बौद्ध महीला, पुरुष बालगोपाल तसेच गावामधील जनता बहुसंख्येने उपस्थित होती सर्व प्रमुख पाहुणे यांनी आपापल्या भाषणामधुन गौतम बुध्द, बाबा साहेब व धम्म दिक्षा यावर जनतेला संबोधित केले कार्यक्रमाचे संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले तर आभार बालेश बागडे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता प्रसाद देऊन करण्यात आली


Post a Comment