विदर्भ दखल न्यूज
चंद्रपूर ब्युरो
चंद्रपूर
दोन दुचाकीची आमने सामने धडक झाल्याने पती सह युवकाचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर रीत्या जखमी झाली आहे. सदर घटना शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजेचा सुमारास ताडाळी मार्गावर साखरवाही गावशेजारी घडली . मयूर सुरेश लांबट वय 30 वर्ष राहणार भद्रावती व ईश्वर गौतम बेडेकर वर्ष 35 राहणार पिंपरी देशमुख अशी अपघातामध्ये मृत्यू पावल्याचे नाव आहे. स्नेहल मयूर लांबट ही महिला गंभीर जखमी झाली असून उपचाराकरिता तिला
चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयातील दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयूर लांबट हे पत्नीला कागदपत्र काही कामाकरिता आवश्यक असल्याने पत्नीला सोबत घेऊन घुगुस येथे गेले होते . दिवसभर आपले काम आटोपून पत्नीसोबत आपल्या दुचाकीने भद्रावतीकडे येण्यास निघाले मात्र प्रवासामध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने समोरासमोर धडक दिल्याने मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी स्नेहल लांबट गंभीरित्या जखमी झाली .घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस प्रशासनाने लगेच घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment