विदर्भ दखल न्यूज
नागपूर ब्युरो
राष्ट्रीय महामार्ग असलेल्या 53 नंबर वर ढाब्याजवळ परिसरात एक मालवाहक ट्रक नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून ट्रकचा चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर ट्रक मधील पाच जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त हाती आले. सदर घटना 16 ऑक्टोबर साडेसहा वाजेच्या सुमारास बामणी गावशिवार् परिसरात घडली. रोहिदास ठाकूर वय 32 वर्ष राहणार कटनी एमपी असे मृत्यू झालेल्या चालकाचे चे नाव आहे तर जखमी झालेल्या मध्ये दिनू संजय मंगलसिंह ठाकूर व पंचवीस वर्षे राहणार नागपूर मोरेश्वर कोरडी वय 24 वर्ष राहणार कुरखेडा महेंद्र भुरा वटी व 21 गणेश सिंह जवाहर सिंह ठाकुर व 24 वर्ष राहणार कटनी एमपी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सदर ट्रक नागपूर वरून रायपुर कडे निघाला होता आणि त्या ट्रक मध्ये टाइल्स भरलेल्या होत्या ट्रक क्रमांक एम एस 40 सीएम 3775 जात असताना बामणी परिसरात राजू ढाब्याजवळ समोरून येणाऱ्या वाहणाला समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकचेचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. ड्रायव्हर ट्रकच्या खाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला जखमी नागरिकांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे

Post a Comment