समता सैनिक दल शाखा वैरागड समारंभ कार्यक्रम संपन्न....

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 

गडचिरोली
आरमोरी - आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (मोठा मोहला ) येथे समता सैनिक दलाच्या शाखेचा समारंभ ससैद चे नामफलक लावून गावातुन दि . ५ ऑक्टोबरला भव्य मिरवणुक काढण्यात आली.
समता सैनिक दलाचे कंमाडर अभिमन्यु बन्सोड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तर उदघाटन घनश्याम फुसे नागपूर यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमांचे अध्यक्ष विठ्ठल वासनिक तर प्रमुख पाहुणे म्हणुन समर्थ सहारे सरपंच संगिता पेंदाम उपसरपंच भाष्कर बोडणे ससदेचे दुर्गे देवाजी भैसारे अर्पना खोब्रागडे संगिता मेश्राम आदि लाभले होते.


याप्रसंगी घनश्याम फुसे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला समता सैनिक दल व दलाचे कार्यकर्ते संकटकाळी धावून जाणारे सच्चे व प्रामाणिक पाईक आहेत लोकांची सेवा करणे सुरक्षा रक्षण करणे हे ससै दलाच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
ससैद कार्यक्रमास व मिरवणुकीत वैरागड व वैरागड परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments