विदर्भ दखल न्यूज 
परभणी ब्युरो 



परभणी
प्रेमी युगल एकमेकांमध्ये आपसात गप्पागोष्टी करत असताना सहा जणांच्या  टोळीने प्रेमी युगलाला जिवे मारण्याचा धाक दाखवत युवतीच्या बॅग मधील पाच हजार रुपये हिसकावून युवतीवर तिघा नराधमांनी





 लैंगिक सामूहिकअत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली. आणि घटनेचे चित्रीकरण सुद्धा नराधमांनी केले. या प्रकरणी आरोपी नराधमांच्या विरोधात पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाआहे तर चार जणांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे सदर घटना 14 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. पीडित युवतीने 19 ऑक्टोबरला पोलीस ठाण्यामध्ये आपली फिर्याद






 दाखल केली आहे. पीडित युवतीचे म्हणणे आहे की मी आणि माझा मित्र मारुती खरात मंगळवार रोजी दुपारी देवी संस्थानच्या मंदिराच्या इटली शिवारात एका झाडाखाली आम्ही गप्पागोष्टी करत बसलो असता  तिथे दुचाकीवरून काही अनोळखी सहा व्यक्ती लाटी काट्या घेऊन तिथे आले आणि तुमच्याकडील काही




 रुपये आम्हाला द्या असे त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पाच हजार रुपये हिसकावले आणि त्यांना लाठ्या काठ्याने जिवे मारण्याचा धाक दाखवत तिघेजणाने युवतीवर सामूहिक आळीपाळीने अत्याचार केला आणि एक मुन्ना नावाच्या नराधमाने घडलेल्या घटनेची शूटिंग सुद्धा केली. पीडीत युवतीच्या





 तक्रारीवरून पोलिसांनी नराधम आरोपी करण दतराव बोरकुले, शेषराव दत्तराव शेवाळे शेख साबीर शेख सत्तार ,करण मोहिते व इतर दोन अल्पवयीन नराधम आरोपिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।  साहा नराधामा पैकी करन बुरकुले शेषराव शेवाळे शेख साबीर मुन्ना टोपे यांना पोलिसांनी अटक केली एक आरोपी नराधम करण मोहिते हा फरार असून आरोपी त्याच्या शोधावर असल्याची माहिती आहे यामधील एक आरोपी अल्पविन आहे याचा शोध पोलिस यंत्रणा करीत आहेत 
सदर घडलेल्या घटनेचा तपास पोलीस प्रशासनाने एका गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार तडकाफडकी लावल्याने पोलीस प्रशासनाचे जनतेकदून आभार व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments