विदर्भ दखल न्यूज
बाळकृष्ण उंबरकर तालुका प्रतिनिधी
नागभीड _
_ नागभीड तालुक्यामध्ये धान कापणी खूप मोठय़ा जोमात सुरु आहे परंतु दिनांक २३/१०/२०२५पासुन तालुक्यामध्ये दररोज कमी जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस सुरु आहे त्यामुळे कापलेले धान व उभे असणारे पडलेले धान पुर्णपणे सडून गेलेले आहेत तसेच जनावरांचा चारा तणिस सुद्धा सडून गेलेली असल्यामुळे शेतकरी यांच्या तोंडात आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला आहे त्यामुळे घेतलेला कर्ज कसा फेडायचा, वर्षभर व्यवहार कसा करायचा, समोर शेती कशी करायची या विवंचनेत शेतकरी बांधव आहे त्यामुळे शासनानी शेतकरी यांची समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी तसेच नागभीड तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकरी यांच्यावर असलेले कर्ज माफ करण्यात यावे, पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावे, रो ह योजनेची कामे लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, विद्यार्थी यांची फी माफ करण्यात यावी व इतरही योजना उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणी नागभीड तालुक्यामधील शेतकरी बांधवांनी केलेली आहे

Post a Comment