पयडी येथे आरपीआयची बैठक संपन्न..

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


धानोरा - धानोरा तालुक्यातील पेंढरी जवळील पयडी येथे रिपब्लिकन पार्टीची बैठक दि. ८ ऑक्टोंबरला आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर आरपिआयचे जिल्हा उपाधाक्ष मारोती भैसारे बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष किशोर बांबोळे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर गेडाम गुलाबराव रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की रिपब्लिकन पार्टी हि डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या खुल्या पत्रावर आधारित पक्ष आहे त्यामुळे जिल्हयातील प्रत्येक गावागावात रिपब्लिकन कार्यकर्ते निर्माण व्हावे असा पक्षाचा आणि माझा मानस आहे. तसेच पुज्य भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वात बौद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळाले पाहिजे यासाठी १२ फरवरी २०२६ च्या दिल्लीच्या मोर्च्यात जास्तीत जास्त संख्येनी



 उपस्थित राहण्याचे आवाहनही बोरकर यांनी केले.
     सदर बैठकीला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर गेडाम सचिव प्रशांत रामटेके देवानंद गेडाम गौतम गेडाम संजित रामटेके जितेंद्र खोब्रागडे तेजेश्वर रामटेके दिपक जनबंधु मेश्राम निर्मला जनबंधु शारदा मेश्राम भाविका गेडाम मंजुळा गिता गेडाम सदानंद मेश्राम आदि सहीत बहुसंख्य बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments