विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे मुलाने जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात दगड मारुन वडिलाला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली .
दादाजी तुळशीराम बगमारे वय
(७०) वर्ष हे पाथरगोटा येथील रहिवासी असून, शेती व्यवसाय करतात. शुक्रवारी सकाळी ते घरा शेजारील शैलेश
बगमारे यांच्याशी काही कामानिमित्य बोलत होते. यावेळी त्यांचा मुलगा प्रमोद दादाजी बगमारे (३५) हा त्यांच्याजवळ आला. आणि वडिलांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत वाद घातला आणि वाद विकोपाला जाऊन अचानक रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात दगड फेकून मारला. वाडीलाला दगड फेकून मारल्याने वडिल गंभीर जखमी झाल्याने आरमोरी पोलिस ठाणे येथे फिर्याद नोंदविली.
वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment