वन्य प्राण्यांची शिकार करणारे आरोपी सापडले वनविभागाच्या जाळ्यात... वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल....


विदर्भ दखल न्यूज 
चामोर्शी ब्युरो 




मार्कंडा कंसोबा वनपरिक्षेत्रातील वनपथकाने 2 ऑक्टोबर रोजी वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे यामध्ये रामकृष्ण मल्लिक, अरुण परिमल बाछड किरण भावेन मंडल राहणार गांधीनगर यांचा समावेश आहे .वन अधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांचे शिकार केलेले अवयव व त्यांचे यंत्रसामग्री व इतर पुरावे जप्त करून वन्य प्राण्यांचे शिकार करणारे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे . काही दिवसापूर्वी परिसरामध्ये वन्य प्राण्यांचे झालेले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची शिकार करणारे आरोपीवर कटोरातील कठोर कारवाई व्हावी अशी सुद्धा जनतेतून मागणी होत आहे .आरोपींना 6 ऑक्टोबर पर्यंत वनर कोठडी ठोठावली आहे आरोपींना न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आले मात्र सुनावणी अंती आरोपींना चौकशीसाठी 6 ऑक्टोबर पर्यंत वन कोठडी सुनावली परिसरामध्ये वन्य प्राण्यांची होत असल्याने आरोपीची कसून चौकशी केली जाणार आहे.
कारवाई केलेल्या पथकामध्ये उपवनसंरक्षक तलमले सहाय्यक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा मोडले क्षेत्र सहायक आर बनवत वनसरक्षक सोनवणे अक्षय राऊत राठोड मडावी आखाडे आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments