वृद्ध महिलेवर वाघाचा हल्ला.. महिला गंभीर जखमी...

विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 


आरमोरी 
आरमोरी तालुक्यातील डोंगरसांवगी येथील वृद्ध महिला पुष्पा नथु राऊत वय 65 ह्या घरा बाहेर सोचालयास गेल्या असता डोंगरी परीसरात घरा लगत दबा धरुन बसलेल्या जंगलातील वाघाने आज रात्रो ६:३० वाजताच्या सुमारास हल्ला करून वृद्ध महिलेला गंभिर जखमी केले यात आरडा ओरडा केल्याने वाघ डोगरीत पळाला महिलेच्या डोक्याला व मान हाताला मोठ्या जखमा पडलेल्या असल्यामुळे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले याची माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना महिलेच्या नातेवाईकांनी दिली असता तातडीने आरमोरी उपजिल्हा रुग्णालय गाठून महिलेची



 तब्येतीची विचारपूस केली उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ रामटेके मैडम यांना तातडीने उपचार करण्यासाठी मागणी केली जखमीची परंतु प्रकृती गंभिर असल्यामुळे त्या जखमी वृध्द महिलेला गडचिरोली येथील भरती करण्यात आले असता समाधी दुरध्वनी वरुण गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महीलेच्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली परंतु या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात भौतिक सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने नागपूर येथील मेडीकलला रेफर करण्याची गरज पडु शकतो असे सांगितले तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ढोलणे यांना तातडीने पंचनामा करुन जखमी महिलेस भरपाई देण्याची तसेच वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments