विदर्भ दखल न्यूज
पुणे ब्युरो
पुणे
पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होत आहे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरातील वाघोली एरियात 4 ऑक्टोबर च्या मध्यरात्री सुमारास चाकुने वार करून एका युवकाची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 4 ऑक्टोबर च्या मध्यरात्री शहरातील प्यासा हॉटेल समोर एका युवकाने आपल्याच सहकारी मित्रावर चाकूने वार करून ठार केले. यामध्ये बादल शेख या तरुणाचा मृत्यू झाला आहे .सध्याच्या घडीला प्रकरणातील आरोपी फरार झाला असून पोलीस प्रशासन त्याच्या शोधमातगावर आहे .पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक युवक आणि हत्या करणारा युवक हे दोघेही रेकॉर्डनुसार गुन्हेगारी स्वरूपाचे असून वाघोली पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
घटनेची सविस्तर माहिती आरोपीचा शोध लागल्यावरच कळणार असे पोलिसांनी सांगितले आहे.

Post a Comment