विदर्भ दखल न्यूज
संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
एटापल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिस भुषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या किशोर वकीलावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच प्रशिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वागंचुक यांची त्वरीत सुटका करण्यात यावी यासाठी एका मागणीचे निवेदन एटापल्ली येथील शिष्ठमंडळाने तहसिलदार एटापल्ली यांच्या मार्फतीने भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन दिले.
सरन्यायाधिस भुषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे होय. अश्या घटना पुन्हा घडू नये यासाठी केंद्र शासनाने काळजी घ्यावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते भिमराव देवतळे प्रभाकर कांबळे प्रभाकर करमे एकनाथ रामटेके प्रमोद देवतळे सहीत बहुसंख्य कार्यकर्त उपस्थित होते.
.

Post a Comment