विदर्भ दखल न्यूज
पुणे ब्युरो
पुणे
पर पुरुषाशी प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून पतीने केला पत्नीचा खून.. पुणे जिल्हा अंतर्गत इंदापूर तालुक्यातील भिगवन पोलीस स्टेशनच्या हदीमध्ये मदनवाडी गावाजवळ पुलियाच्या खाली काही दिवसापूर्वी गरोदर महिलेचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलेला होता. आणि एकच खळबळ उडाली होती मात्र या घटनेच्या पोलीस विभागाने प्रकरणाचा छडा लावून प्रकरण उघडकीस आणले होते .आणि त्या महिलेचा खून तिच्या पतीने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नामें दिपाली सुदर्शन जाधव ह्या महिलेचा परपुरश्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय पतीच्या मनात भरला होता आणि त्या कारणामुळे 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळच्या सुमारास पती-पत्नी दोघांमध्ये वाद झाला आणि तो वाद विकोपाला जाऊन वादाचे रूपांतर रागात होऊन रागाच्या भरात आरोपी पती सुदर्शन उर्फ विराज रणजीत जाधव पत्नीच्या डोक्यामध्ये लोखंडी वस्तू हाणली यामुळे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच गतप्राण झाली . आरोपी पतीने आरोपी पतीने इकडे तिकडे बघत एकांतात मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून दुचाकी वर मांडून भिगवन बारामती रस्त्याने मदनवाडी गावाजवळ पुलियाच्या खाली फेकून दिला. अशी माहिती मिळाली आहे . घटनेचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment