विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी
आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे दीपावलीच्या निमित्ताने दिनांक 22..10..2025 बुधवार रोजी रात्री 10 वाजे रामकृष्ण गेडाम गजानन ताडाम यांच्या वतीने पंचरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन कोजबी येथील पोलीस पाटील माधुरी सहारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रवीण चहांदे पत्रकार दिनेश बनकर
विनोदजी मानकर माजी सरपंच ईश्वरजी मेश्राम तंटामुक्त अध्यक्ष गुलाब ताडाम, कन्नाके सर शिशुपाल कन्नाके,प्रकाश गेडाम अनुरथा मुल्लेवार अंगणवाडी शिक्षिका शामलता घोडाम अंगणवाडी शिक्षिका आदि मान्यवरांची उपस्थिती होती. पंचरंगी कार्यक्रमांमध्ये
छोट्या छोट्या बालकांचे समूह नृत्य व एकल नृत्य घेण्यात आले. कार्यक्रमांमध्ये जादुई कलेचा आविष्कार प्रयोग जादूगर रामकृष्ण गेडाम यांनी करू दाखविला त्यामध्ये बरेच काही जादुई हातकलेचे प्रयोग दाखवीण्यात आले. जादुई कलेचे आविष्काराने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. आमचे प्रतिनिधी जादूगर रामकृष्ण गेडाम यांच्याशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितले की येथे जादू वगैरे काही नसून हातकलेची कला असल्याचे त्यांनी
सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन ताडाम यांनी केले तर संचालन अतुल चहांदे तर आभार प्रदर्शन गुलाब ताडाम यांनी मांनले कार्यक्रमाला गावातील परिसरातील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गिरीधर दुमाने, गुलाब ताडाम मेघराज गेडाम, अविनाश गेडाम ,गजानन ताडाम, विनोद जुमनाके अमित गेडाम,देवरावजी गेडाम ,आदींनी सहकार्य केले.





Post a Comment