गोंदोला समूह आदिवासी बांधव कोरपण्याच्या मोर्चाने दिली तहसीलदार धडक, निघाला आक्रोश मोर्चा...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली




कोरपना - आदिवासी आरक्षण बचाव साठी गोंदोला समुह आदिवासी बांधवाचा भव्य मोर्चा कोरपना तहसिलवर धडकला व तहसिलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.
बंजारा समाजातील लोकांना आदिवासी समुहात समाविष्ठ करू नये. पेशा अंतर्गत पद भरतीत गैर आदिवासींना घेऊ नये आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर देणारा शासनाचा जिआर रद्द करावा आदिवासी समाजाची जनगणना करावी वनहक्काचे प्रलंबित दावे निकाली काढावे पेशा अर्तंगत सेवानिवृत्त शिक्षकांना न घेता बेरोजगारांना नोकरी घ्यावी आदिवासींच्या जागेवर गैर आदिवासी नोकऱ्या करीत आहेत अश्यांना नोकरीतून हद्दपार करावे आदि मागण्याचे निवेदन आदिवासी बांधवानी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.


सदर मोर्च्याचे नेतृत्व आदिवासी प्रवक्ता सुरेश जुमनाके अध्यक्ष संजय सोयाम सचिव सुंगा तोडसाम लक्ष्मण पंदरे चामोर्शीचे कोवे महाराज यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येनी गोंदोला समुह आदिवासी बांधवाचा मोर्चा कोरपना तहसिल कार्यालयावर धडकला होता.

0/Post a Comment/Comments