विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
मुंबई - बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्याच ताब्यात घ्यावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन नेते व सामाजिक संघटना , भिक्खुसंघ एकवटले होते. भव्य अश्या आंबेडकरी मोर्च्यात व सभेत रिपब्लिकन पार्टी चे मंत्री रामदास आठवले , डॉ. राजेंद्र गवई , प्रा. जोंगेंद्र कवाडे , सुलेखाताई कुंभारे खासदार वर्षा गायकवाड नानासाहेब इंदिसे डॉ. सुरेश माने आमदार राजकुमार बडोले चंद्रकांत हांडोरे ,संजय बनसोड संतोष बांगर माजी मंत्री भाई गिरकर अविनाश महातेकर अर्जुन डांगळे गौतम सानवणे आनंद शिंदे राजा सरवदे बालाजी किनिकर डॉ. राजु वाघमारे आदि सहीत आरपिआयचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने मंचकावर उपस्थित होते मात्र वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची अनुपस्थित तर्कवितर्क बाबत लढविल्या जात होते.
याप्रसंगी मंत्री रामदास आठवले म्हणाले की सरकार कोणाचेही असो आम्ही कोणत्याही पक्षाच्या युतीत असो परंतु जेव्हा जेव्हा समाजाच्या हिताचे प्रश्न येतात तेव्हा तेव्हा आपण आपले गट तट विसरून एकत्र आलो पाहिजे. बौद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्ध बांधवाचे आहे ते आपल्या ताब्यात असले पाहीजेत त्यामुळे बौद्धगयेचा संपूर्ण ताबा बौद्धाच्या ताब्यात घ्यावा हि मागणी घेऊन आज आपण एकत्र आलोत.
महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा १९४९ रद्द करावा व महाबोधी विहार बौद्धाच्या ताब्यात घ्यावा अशी एकमुखी मागणी प्रा. जोंगेंद्र कवाडे डॉ. राजेंद्र गवई , वर्षा गायकवाड सुलेखाताई कुंभारे आमदार राजकुमार बडोले अर्जुन डांगळे यांच्या भाषणातून सुर निघाला.
समाज हा विचार वाचविण्यासाठी एकत्र आला आहे. काही नेते आले किंवा नाही तरी पुढील लढा
एकत्रीतपणे लढू हि ऐक्याची सुरवात आहे असे माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी व्यक्त केले. मोर्चा व आझाद मैदानातील सभेला आंबेडकरी जनतेची प्रंचड गर्दी जमली होती. बौद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यांत घेण्यासाठी पुढील दिशा रिपब्लिकन नेत्यांनी ठरवावी आंबेडकरी जनता तुमच्या पाठीसी आहे तसेच येणाऱ्या निवडणुकीतही ऐक्याचे दर्शन घडवावे अशा आंबेडकरी जनतेचा सुर होता.



Post a Comment