विदर्भ दखल न्यूज
सावली ब्युरो
सावली
सावली तालुका अंतर्गत पेडगाव माल येथील रहिवासी भाऊजी चिरकुटा भोयर (वय ४०) या तरुणाचा शेतात फवारणी करीत असताना सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी शेतामध्ये घडली.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मृतक शेतकरी भाऊजी चिरकुटा भोयर हे आपल्या शेतात फवारणीचे काम करीत असताना अचानक काही तरी पायाला चावा घेतल्याचे लक्षात आले असता त्यांनी गावाकडे धाव घेतली आणि सावली ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता गेले मात्र प्रकृती खालावत असल्याने ग्रामीण रुग्णालय सावली येथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविले गडचिरोली येथील . जिल्हा रुग्णालय येथे गेले असता प्रकृती जास्त खालावली वैद्यकीय अधिकारी यांनी चेकअप करून मृत घोषित केले.. मृत भाऊजी यांचा मागे पत्नी व दोन मुले आहेत घरातील कर्ता कमावता पुरुष गेल्याने हळ हळ व्यक्त होत आहे…
शेतकऱ्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने प्रशासनाणे
आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी नातेवाइक परिवाराणी केली आहे.

Post a Comment