विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ मध्ये गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात एकुण प्रभाग१३ व वार्ड २७चे नगरसेवक वार्डनिहय आरक्षण सोडत । ८-१०-२०२५ ला गडचिरोली नगरपरिषद सभागृहात आरक्षण जाहीर करण्यात आले नगरपरिषदेच्या यात या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले👈
सोडतीनुसार एकूण १३ प्रभागांसाठी आरक्षण निश्चित झाले असून, प्रत्येक प्रभागातील जागा विविध प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
१) महात्मा ज्योतिबा फुले -प्रभाग क्रमांक १) मधील ‘अ’ जागा अनुसूचित जाती (महिला) तर ‘ब’ जागा सर्वसाधारण वर्गासाठी राखीव आहे.
२)प्रभाग क्रमांक २ लाजेडा मध्ये- अनुसूचित जमात व सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांना अनुक्रमे जागा राखीव ठरल्या आहेत.
३)प्रभाग क्रमांक ३ स्नेहनगर मध्ये -नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला) असा क्रम असून,
४)प्रभाग क्रमांक ४ रामनगर मध्ये- अनुसूचित जमात (महिला) आणि सर्वसाधारण वर्ग,
५)प्रभाग क्रमांक ५ छत्रपती शाहू नगर मध्ये- अनुसूचित जाती (महिला) आणि सर्वसाधारण वर्ग,
६)तर प्रभाग क्रमांक ६ - कॅम्प एरिया -मध्ये नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला) असा आरक्षणाचा क्रम आहे.
७)प्रभाग क्रमांक ७ गणेशनगर-मध्ये अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागासवर्ग (महिला),
८)प्रभाग क्रमांक ८- महात्मा गांधी वार्ड -मध्ये नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण,
९)प्रभाग क्रमांक ९- हनुमान वार्ड मध्ये- नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला),
१०)प्रभाग क्रमांक १०-विसापुर मध्ये -अनुसूचित जमात आणि सर्वसाधारण (महिला),
११)प्रभाग क्रमांक ११सोनापुर मध्ये -अनुसूचित जमात (महिला) आणि सर्वसाधारण,
१२)प्रभाग क्रमांक १२-झाशीनगर- मध्ये नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण,
१३)प्रभाग क्रमांक १३ गोकुलनगर मध्ये -अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
या सोडतीनंतर आता निवडणुकीसाठी प्रभागनिहाय जागांचे आरक्षण निश्चित झाल्याने पुढील निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. सदर आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर ते मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) असा ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या या हरकती अथवा सूचना नगरपरिषद कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment