नागपूर
ट्रकच्या चालकाने ट्रक वाहन रिव्हर्स घेत असताना मजूर ट्रकच्या खाली आल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बरसन शिरमोर वय 42 वर्ष राहणार फ्लॅट नंबर 75 धरम नगर भरतवाडा रोड कळमना नागपूर असे मृत पावलेल्या मजुराचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक मजूर हा बुधवारी दिवशी नंदनवन परिसरातील खरबी चौकाजवळील एका धान्य गोडाऊन जवळ कामासाठी केला होता तो काम करीत असताना दोन अठरा का मधोमध उभे असताना ट्रकचालक रिव्हर्स घेत होता रिव्हर्स घेत असताना सदर ट्रक मधुराच्या अंगावर गेल्याने मजूर जखमी झाला .सदर मजुराला लगेच उपचाराकरिता खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृतक मजुराची मुलगी नीलिमा बरसन शिरमोर वय 18 वर्ष ह्या मुलीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे

Post a Comment