विदर्भ दखल न्यूज
बुलढाणा ब्युरो
मिळालेल्या माहितीनुसार
बुलढाणा जिल्हा अंतर्गत मलकापूर शहरांमध्ये शुक्रवार 10 रोजी सकाळच्या सुमारास एका शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे जीपच्या माध्यमातून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेडी गाव परिसरात पोलिसांच्या थरारक पाटलागा नंतर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे तर गावातील नागरिकांनी अपहरण कर्त्यांची कार पेटवून दिली. गंगेश्वर मंदिरा जवळ सकाळच्या सुमारास तीन मुली नेहमी प्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या .मात्र एक लाल रंगाची mh0 1Pa 8739 क्रमांकाची कार तिथे आली आणि कारमधील तरुणांनी शाळेमध्ये जात असलेल्या तरुणी पैकी एका तरुणीला ओढत नेवून गाडीत बसविले आणि गाडी पळविली. सोबत असलेल्या दोन तरुणींनी आरडा ओरड करून घराकडे एकच धाव घेतली .आणि घडलेला सर्व प्रकार
घरच्यांना सांगितला घरच्यांनी लगेच पोलिसांना माहिती.दिली
पोलिस सतर्क होऊन बसस्थानक चौकात नाकाबंदी केली .
मात्र मुजोर आरोपींनी नाकाबंदी तोडून कार बुलढाण्याकडे नेली
पोलिसांनी अपहरण कर्त्याच्या गाडीचा पाठलाग सुरू केला मात्र वाटेत अपहरण कर्त्याच्या गाडीचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली अन् अपहरण कर्त्याचा डाव फसला. लगेच पोलिसांनी गाडीत बसलेल्या बेशुद्ध मुलीला बाहेर काढले आणि तिला उपचाराकरिता दवाखान्यामध्ये दाखल केले घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आणि अपहरण कर्त्याना लोकांनी मारहाण करून चांगलाच चोप दिला आणि कार पेटवून दिली यामध्ये कार पूर्णतः जळून खाक झाली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे .यामध्ये सय्यद शाकीर, सय्यद वहाब वय 20 वर्ष इम्रान सिद्दिकी वय 21 वर्ष , उबेद पठाण वय 19 वर्ष सर्व माजलगाव बीड यांचा समावेश आहे. अपहरणाच्या घटनेमुळे घटनास्थळी काही काळ ताणतणाव निर्माण झाला होता मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थिती हाताळली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment