विष प्राशन करून शेतकऱ्याने संपविली जीवन यात्रा...


विदर्भ दखल न्यूज 
कोरपना ब्युरो 


कोरपना 
सततच्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाल्याने शेती पिकासाठी कर्ज घेतले असल्याने कर्ज फेडायचे कसे या विवंचनेमधून मधून शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 11.30 वाजे सुमारास घडली सदर घटना कोरपना तालुक्यातील हात लोणी या गावात घडली. गजानन पुनम मालेकर वय 38 वर्ष असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार कोरपणा तालुक्यातील हातलोणी येथील शेतकरी गजानन पुनम मालेकर वय तीस वर्षे यांनी चालू हंगामामध्ये शेती पीक करिता कर्ज घेतले होते .मात्र अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे शेतातील पीक उध्वस्त झाल्याने त्यांच्या मनामध्ये सतत चिंता होत होती कर्ज फेळायचे कसे .याच चिंतेमधून मधून गजानन पुनम मालेकर यांनी विष प्राशन केलेअसावे .लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी व बराच मोठा परिवार आहे घरातील कर्ता माणूस गेल्याने परिवारात दुःखाचे डोंगर कोसळले आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments