बुद्धधम्मा शिवाय जगाला पर्याय नाही, प्रा. मुनीश्वर बोरकर ...

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो


गडचिरोली - सम्राट अशोक बुद्ध विहार अशोकवन कॉलनी गोकुळनगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला . यावेळी अध्यक्षीय स्थानावरून आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की, जगात संध्या खूप अस्थिरता निर्माण झाली आहे . जगात शांतता नांदायची असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही बुद्धाचे विचारच जगाला तारू शकतात तर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , ज्योती जुमनाके जिल्हा संयोजक राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद , वर्षा कन्नाके जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद , दशरथ साखरे जिल्हा उपाध्यक्ष आरपिआय , द्वारकाप्रसाद वालदे माजी व्यवस्थापक हे होते .
बामसेफ जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर म्हणाले बुद्धाची क्रांती ही स्वातंत्र , समता , बंधुभाव व न्यायावर आधारित होती. पंचशिल झेंडाचे ध्वजारोहन अमिता भैसारे व कृष्णा भैसारे यांनी केले .
कार्यक्रमाचे संचालन मंडळाच्या अध्यक्षा निशा बोदेले यांनी केले . प्रास्ताविक स्मिता म्हशाखेत्री यांनी केले तर आभार प्रेमलता कान्हेकर यांनी मानले .



या कार्यक्रमाला भिमराव गोंडाणे , दामोधर शेंडे , हेमंत उंदिरवाडे , डंबाजी बावनवाडे , कल्याणी गोंडाणे , सुरेखा ठाकुर, निता उंदिरवाडे , सुकेशिनी रामटेके , सुलोचना साखरे , जिजा शेंडे , लक्ष्मी साळवे , बेबी उंदिरवाडे ,यशोधर शेंडे इत्यादि बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments