विदर्भ दखल न्यूज
कुरखेडा ब्युरो
कुरखेडा
कुरखेडा तालुक्यातील सोनसरी गावात एका 32 वर्षीय विवाहित असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सहा ऑक्टोबरला रात्री घडली आहे . महागुरू उईके असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सोनसरी येथील
आकाश महागुरु उईके वय 32 वर्ष हा युवक सोनसरी येथे परिवारा सोबत राहत होता आणि तो मोल मजुरीचे काम करून परिवाराला सहाय्य करीत होता. मात्र त्याने 6 ऑक्टोबरला रात्री 8 वाजे सुमारास आपल्या राहत्या घरामध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याने कुटुंबियांना धक्काच बसला लगेच कुटुंबीयांनी त्याला खाली उतरवून उपचाराकरिता कुरखेडा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी शेवटी त्याला मृत घोषित केले. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. घटनेच्या पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.

Post a Comment