विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
चामोर्शी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती घोट च्या वतीने धम्मचक्रप्रर्वतन दिन (विजयादशमी ) चा कार्यक्रम दि. २ ऑक्टोंबर २०२५ सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकर चौक घोट येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष घोट च्या सरपंच्या रुपालीताई दुधबावरे ह्या राहणार असुन मुख्य मार्गदर्शक म्हणुन ॲड. प्रियंका चव्हाण ह्या असुन प्रमुख अतिथी म्हणुन ग्रा.प सदस्य करण गण्यारपवार आरपिआयचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर RFO वाडीघरे प्राचार्य गजभिये वंबआ चे देव्हारे माजी प्राचार्य कांबळे डॉ. मेश्राम उपसरपंच विनय बारसागडे पंचभाई सर आदिची उपस्थिती लाभणार आहे.
होवु घातलेल्या कार्यक्रमास घोट सर्कल मधील बहुजन बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष विशाल दहिवले सचिव प्रदिप वाकडे यांनी केलेले आहे.

Post a Comment