जंगली हत्तीच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार, परिसरात पसरली हत्तीची दहशत..

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली ब्युरो


गडचिरोली, ता. 10 -: जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातील पोर्ला हद्दीत
आज सकाळी भीषण घटना घडली गडचिरोली तालुक्यातील . चुरचुरा येथील वामन मारुती गेडाम हा गुर चारण्याचे कामे करतो तो नेहमीप्रमाणे  गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. मात्र रानटी हत्तीने त्याच्यावर हल्ला केल्याने हत्तीच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ उपाययोजनेची मागणी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अमिर्झा, चुरचुरा, दिभना परिसरात रानटी हत्तींचा कळप सतत वावरत आहे. जंगली हत्तीचे बस्तान शेत शिवारात जास्त प्रमाणात असल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अश्यातच आज नेहमीप्रमाणे चुरचुरा येथील



 मारोती गेडाम या गुराख्याने गुरे राखण्यासाठी जंगलाचा रस्ता धरला असता अचानक आलेल्या हत्तीने त्याच्यावर हल्ला केला. आणि हत्तीच्या हल्ल्यात त्याचा जीव गेला.हल्ला एवढा मोठा होता की  त्याचा मृत्यू जागीच झाला. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून ओडिशा राज्यातून रानटी हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहेत. या हत्तींच्या स्थलांतरामुळे शेतजमिनींचे प्रचंड नुकसान होत असून ग्रामस्थांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. हत्तींचा वाढता वावर वनविभागासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर आजच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आणखी गडद झाले असून त्यांनी वनविभागाने तातडीने पावले उचलून हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, बाधित कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत द्यावी आणि संरक्षणाची ठोस यंत्रणा उभी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे 
परिवारातील कर्ता पुरुष एकाकी गेल्याने परिवारावरती 
मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे.गाव परिसरात मोठी 
हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाने जंगली हत्तीचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होवू लागली आहे.
घटनास्थळावर वन प्रशासन ,पोलीस प्रशासन दाखल असून घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments