मुरमाडी येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत सोडे बिटस्तरीय क्रिडा सम्मेलन दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली व्दारा संचालीत अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मुरमाडी येथे दिनांक २३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२५ दरम्यान होत आहेत,या बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन सोहळा दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी थाटात पार पडला.
उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष श्री.देवाजी नरुले साहेब हे होते.तर उदघाटक म्हणुन मुरमाडी चे सरपंच श्री.भोगेश्वरजी कोडाप उपस्थित होते.त्याच सोबत विशेष अतिथी म्हणून डाॅ सुरेश लडके साहेब दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली चे सदस्य उपस्थित होते,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.संंतोष कन्नाके क्रीडा समन्वयक श्री सतीश पवार मुख्याध्यापक श्री डोंगरे सर मुख्याध्यापक श्री क-हाडे सर मुरमाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्री अशोकजी भुसारी,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य श्री विनायक भोयर, सेवानिवृत्त पदविका शिक्षिका कु निर्मला हजारे, सेवानिवृत्त शिक्षक श्री.घनशाम परसुरामकर, माध्यमिक मुख्याध्यापक श्री हेमंत चुधरी, प्राथमिक मुख्याध्यापक श्री देविदास लांजेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या तिन दिवस चालणाऱ्या क्रिडा स्पर्धेत एकुण १० शाळांचा समावेश असून एकुण ७०० खेळाडूचा सहभाग राहणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात विर शहीद बिरसा मुंडा व शिक्षण महर्षी श्रध्देय गो ना मुनघाटे,साहेब दंडकारण्याच्या मातोश्री कमलताई मुनघाटे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.त्यानंतर माननिय अतिथींच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
या क्रिडा स्पर्धेत अनुदानित शाळा,मुरमाडी,जपतलाई,आरमोरी परसवाडी तर शासकीय आश्रमशाळा सोडे,रांगी,भाकरोंडी,मुरुमगाव सावरगाव कुऱडीमाल या शाळाचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन श्री अजय नरुले यांनी केले तर आभार श्री महेश बोरेवार यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री. नेताजी गावड, श्री सुधीर म्हशाखेत्री,श्री. अजय वाकडे, धुर्वे मॅडम, पेदापल्ली मॅडम, कुलसंगे मॅडम, खंडाते सर, चापले सर, बिसेन मॅडम,अनिल सहारे, रुकमोडे सर,मेश्राम सर,दरवडे सर, कुमरे सर,वंजारी मॅडम,बखर सर,हर्षे सर,वसीम पठाण, कोरचा सर, घोडाम सर,नाकतोडे मॅडम,श्री चंद्रकांत कोहपरे श्री नरेंद्र भोयर कु रंजुताई उंदिरवाडे कु सपना ठाकरे,श्री देवानंद जांभुळकर श्री प्रदिप वाढणकर,श्री संदिप बोधलकर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments