गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली: जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र गडचिरोली अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षासाठी बसलेल्या खाजगी अनुदानित शाळा आणि इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेतील हिंदी, इंग्रजी व मराठी माध्यमांच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालय ,चामोर्शी रोड,गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रम ओळख ,प्रश्नपत्रिका स्वरूप आणि गणितातील सुलभ पद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला बसलेल्या खाजगी अनुदानित शाळा व इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळांमधील हिंदी, मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment