गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
मुंबई -
मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील इतरही शहरात झोपडपट्टी धारकांच्या समस्या अधिकच निर्माण होत आहेत. विकास ही चांगली बाब आहे. गेल्या २५ वर्षांपासून ग्रामीण भागातील लोक स्वतःच्या कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी शहरात येऊन निवास करीत आहेत.मात्र विकासाच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत आहे.पनवेल शहरात उड्डाणपुलाच्या कामामुळे आसूडगाव येथील १०० झोपड्या पूर्णपणे उध्वस्त करून टाकल्या.यामुळे शंभर दोनशे कुटुंबाला बेघर व्हावे लागले आहे. त्यांचा निवारा उद्ध्वस्त झाल्याने राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.म्हणूनच आपल्याला न्याय मिळावा यासाठी आसूडगाव येथील १०० झोपडपट्टी धारक लोकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. सदर उपोषणाला श्री. समया पसुला,उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी भेट देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुषंगाने श्री. समया पसुला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन पनवेल शहरालगत असलेल्या आसूडगाव येथील १०० झोपडपट्टी धारकाचे प्रश्न सोडवून देऊन त्यांना पक्की घरे बांधून द्यावीत अशी मागणी निवेदनातून केली आहे.त्यासोबत महाराष्ट्रातल्या मुंबईसह गडचिरोली,
चंद्रपूर,भंडारा,नागपूर,अमरावती,यवतमाळ,पुणे, ठाणे, सोलापूर,कोल्हापूर यासारख्या अनेक शहरातील झोपडपट्टी धारकाचे पुनर्वसन करून हक्काचे घर बांधून द्यावे.जेणेकरून झोपडपट्टी धारक स्वतःच्या कुटुंबाचा प्रपंच व्यवस्थित चालवून विकासाच्या प्रवाहात येईल.नाही तर महाराष्ट्रात अनेक शहरात झोपडपट्टी धारकांचे अनेक समस्या निर्माण होतील.


Post a Comment