गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
नागपूर -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Founder B. R. Ambedkar) च्या महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी डॉ. गौतम गोसावी यांनी विविध जिल्ह्यांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या निर्णयामुळे पक्षाच्या कार्याला नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे मुळे पक्षाचे बळकटीकरण होईल असा अंदाज आहे.
नवीन नियुक्तीनुसार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणुन प्रा. मुनिश्वर बोरकर यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले बोरकर सर यांच्याकडून पक्षाला गडचिरोली जिल्ह्यात नवा उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पक्षाची दिशा आणि विचारधारा
नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे यांनी सांगितले की, पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालत असून सामाजिक समता, समानता आणि बंधुता यासाठी कार्यरत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांमुळे स्थानिक स्तरावर पक्ष अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याची ताकद दिसून येईल.
गडचिरोली जिल्हातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल जिल्ह्यातील बाराही तालुक्यात असलेली रिपाईची कार्यकारणी जैसे थे ठेवण्यात येइल असे प्रा.बोरकर यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
या घोषणेनंतर गडचिरोलीसह विविध भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांचा *रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई साहेब यांच्या हस्ते गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला. बोरकर यांनी डॉ. राजेंद्र गवई साहेब प्रकाश कुंभे माजी जि.प सदस्य ॲड. राम मेश्राम गोपाल रायपुरे आदिचे आभार मानले .


Post a Comment