गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
आरमोरी : आपल्या गावात मोठा लोकप्रतिनिधी यावा यासाठी गावकरी स्वातंत्र्याच्या 78 वर्षांपासून वाट बघत होते परंतु खासदार गावात आले नसल्याची खंत सायगाववासीयांनी व्यक्त केली .परंतु अचानक गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार डॉ नामदेवराव किरसान अचानक सायगावात पोहचले असता ग्रामस्थांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. अन पहिल्यांदाच खासदार गावात पोहचले असल्यामुळे ग्रामस्थाचा आनंद द्विगुणित होऊन गणेशोत्सवाचा उत्साह जोमात साजरा केला. खासदारांनी गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावात आणि जयघोषात त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर खासदारांनी ग्रामस्थांसह गणपती बाप्पा चे दर्शन घेतले. व गणेश मूर्तीसमोर आरती करून त्यांनी श्री गणरायाकडे सायगाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर खासदारांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच यां गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न असेल. असे आश्वासन दिले गावकऱ्यांनी देखील खासदार डॉ किरसान सोबत थेट संवाद साधत रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि शिक्षण यासंदर्भातील प्रश्न मांडले. खासदारांनी या सर्व मागण्यांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी खासदारांचा सत्कार करून त्यांना आभार मानले.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम चांदुभाऊ प्रधान नायब तहसीलदार गडचिरोली ग्रामपंचायत सदस्य होमराज प्रधान विठ्ठल नारदेलवार गणपत कोपुलवार दीपक हlरगुळे पो. पा रामकृष्ण प्रधान मा. पो पा सदाशिव कोपुलवार आनंदाराव दुमाने दिगंlबर राऊत नारायण प्रधान हरिचंद्र कांबळे मनोहर दुमाने प्रभू माकडे मारोती माकडे रवींद्र दुमाने प्रकाश प्रधान भावराव माकडे धनराज डुंबरे सुधाकर धोटे टिकाराम प्रधान कवडू कोपुलवार राधेशाम कोपुलवार सुखदेव प्रधान हिरालाल कांबळे लक्ष्मण प्रधान तरकड दुमाने यांसह नागरिक युवक महिला उपस्थित होते.

Post a Comment