गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
देसाईगंज ब्युरो
*दिनांक:- ०५ सप्टेंबर २०२५*
देसाईगंज:- गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. होळी चौक, कुरूड येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार कृष्णाजी गजबे यांचे स्थानिक विकास निधीतून नव्याने बांधलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मा. आमदार कृष्णाजी गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ सप्टेंबर २०२५ रोजी कुरुड चे सरपंच सौ. प्रीतीताई मडावी तसेच उपसरपंच श्री शंकरजी पारधी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी मा. आमदार कृष्णाजी गजबे म्हणाले की, ‘‘सभामंडप गावाच्या एकतेचा केंद्रबिंदू असून, यामुळे गावातील सार्वजनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना गतिमानता मिळेल. मी गावाच्या विकासासाठी आणि लोकहितासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. प्रत्येक ग्रामस्थाने एकत्रितपणे काम करून गावाचा पाया अधिक मजबूत करावा. ही सुविधा ग्रामवासीयांच्या हिताची आहे, आणि माझ्या कार्यकाळात विविध मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गावाचा विकास आणि प्रगती हेच माझ्यासाठी खरे यश आहे,’’ असे मत व्यक्त केले.
लोकार्पण कार्यक्रमात भारत ढोरे, हरिश बुल्ले, शामराव ठाकरे, सुभाष ठेंगरी, निलेश ठाकरे, कार्तिक उरकुडे, कार्तिक पारधी, गौरव बुल्ले, प्रफुल दरवरी, गोलू ठाकरे, राकेश ठाकरे, सुधीर ठेंगरी, केशव ठाकरे, रामेश्वर ढोरे, हेमराज नागतोडे, पंढरी बुल्ले, प्रशांत पारधी, नंदेश्वर पारधी, विनोद ढोरे, दिवाकर पिलारे, महेश बागडकर, वैभव रोकडे, अमोल सहारे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सभामंडपाच्या लोकार्पणानंतर ग्रामस्थांमध्ये समाधानाचा व आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. ही सुविधा सांस्कृतिक, सामाजिक आणि जनसुविधा कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार असून, गावात एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment