नवरगाव ,पोर्ला येथे जंगली हत्तीचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या घाणपिकाचे अतोनाथ नुकसान...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा .
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील पोर्ला जवळील नवरगांव येथे दि. ४ संष्टेंबर २०२५च्या रात्रौ नवरगांव शेतकऱ्यांच्या अनेक शेतात हत्तीच्या झुंडीने प्रवेश करून शेतकऱ्यांच्या उभ्या शेतपिकाचे २५ ते 30 एकराचे नुकसान केले.
यात शेतकरी राजहंस जांभुळकर देवराव धाकडे जासुंदा भैसारे वसंत चुधरी निलकंठ भैसारे विलास गोडमारे दादाजी धाकडे इंदिरा उंदिरवाडे जिजाबाई उंदिरवाडे सहीत बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकाचे नुकसान केलेले आहे.


पहाटेला हत्तीचा कळप २० ते २२ हत्ती देलोडा मार्ग जंगलात गेल्याची समजते. वनविभाग पोर्ला तलाटी साजा यांना माहीती देण्यात आली असून नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नवरगांव शेतकऱ्यांनी केलेली आहे.

.

0/Post a Comment/Comments